इतिहास

            समाजात अर्थकारणाच्या गरजांची पूर्ती करण्याच्या हेतूने राजकीय, गावातील प्रतिष्टीत नागरिक आणि व्यावसायिकांनी एकत्र येउन सन २०१८ पासून ते आज पर्यंत उत्तमरीत्या चालवलेली पतसंस्था म्हणजेच संस्कार पतसंस्था होय. श्री चांगदेव फाये , श्री मनीष फाये , श्री नितीन कावळे आणि त्यांच्या सहकारी मित्रांनी स्थापन केलेली हि पतसंस्था सातत्याने प्रगती करत आहे. या संस्थेची सुरुवात संस्थापक श्री मनीष फाये यांचे पवित्र वास्तूत झाली. प्रथम २००० सभासदांचे कडून रु.२०,००,०००.०० भांडवल गोळा करून संस्थेने आपले कामकाज सुरु केले. आज संस्थेने सहकार क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा कायम केला आहे. सहकारातील नियम व अटीच्या अधीन राहून उत्तमरीत्या सहकाराचा विचार सभासदांच्या व संस्थेच्या हितासाठी वापरण्याचे सांघिक कार्य कसे करावे याचे संस्कार पतसंस्था एक उत्तम उदाहरण आहे.